आदर्श विद्यालयात सामूहिक पालक मेळावा संपन्न


आदर्श विद्यालयात सामूहिक पालक मेळावा संपन्न
स्थानिक आदर्श विद्यालय,

वर्ग पाचवी ते बारावी आपला प्रवेश निश्चित करा
सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांसाठी शिस्तप्रिय शाळा

चिखली येथे वर्ग 9 वा अ ते 9 वा ग या 7 तुकड्यांचा एकत्रित पालक मेळावा
दिनांक 13/02/2026, शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता एमसीव्हीसी हॉलमध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री. सतीशजी गव्हले सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले तसेच विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री. लक्ष्मीकांत जी शेटे सर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी मंचावर पालक प्रतिनिधी श्री प्रभात जी देवघरे व सौ सुषमाताई कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात सौ.भावसार मॅडम यांनी पालक मेळाव्याचा उद्देश सांगून वर्ग नववी हा दहावीचा पाया असून याच वर्गात दहावीची जडणघडण होत असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्ग नववी चा अभ्यास गंभीरतेने करावा असे प्रतिपादन केले. यासाठी शिक्षकांचे तसेच पालकांचेही सहकार्य आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.
पालक मेळाव्याचे माननीय अध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य श्री गव्हले सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून पालकांशी सुसंवाद साधला. आदर्श विद्यालयातील शिक्षक स्वच्छता, शिस्त व गुणवत्ता या तीन मुद्द्यांवर काम करत आहे, मुलांच्या हितासाठी शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत याबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली. शाळेतील 90% शिक्षणाचा वापर समाजामध्ये होतोच कारण प्रत्येक विषय आम्हाला जगण्याचे नियम शिकवतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थितपणे करावा व त्यासाठी पालकांनी सजग असावे असे त्यांनी प्रतिपादन केले, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपले आई वडील हे आदर्श असले पाहिजे कारण विद्यार्थ्याच्या वागण्यातूनच आई-वडिलांचे कर्तुत्व दिसते, असेही ते पुढे म्हणाले. विद्यालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक व भौतिक सुविधांबद्दल त्यांनी पालकांना विस्तृत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी व उज्वल भविष्यासाठी पालकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री शेटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रथम पालक मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तसेच भावनिक बदल होत असतो तो समजून घेऊन विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते पालकांनी निर्माण करावे, या वयात जर पाल्य आपल्यापासून दूर गेले तर ते परत जवळ येणार नाहीत त्यासाठी आवर्जून त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधा असे आवाहन त्यांनी उपस्थित पालकांना केले.
उपस्थित पालकांपैकी श्री निवृत्ती जाधव, श्री प्रभात देवघरे, श्री सुभाष डहाके व सौ सुषमा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला पाल्य आदर्श शाळेमध्ये शिकतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप मेहनत घेतात, फक्त पालकांनीच आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा असे प्रतिपादन केले.
पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री श्रीकृष्ण वाघ सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ बाहेकर मॅडम यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी वर्ग नववीचे वर्गशिक्षक वाघ सर, जोशी मॅडम, परिहार मॅडम, बाहेकर मॅडम,  भावसार मॅडम व देशमुख मॅडम यांनी परिश्रम घेतले.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!