प्रशांत डोंगरदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

बुलढाणा : शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या चळवळीत सक्रियपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत डोंगरदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभाग, बुलढाणा जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेनुसार सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष पंडित कांबळे यांनी प्रशांत डोंगरदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागा च्या बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली.
या नियुक्तीचे पत्र विदर्भ प्रभारी तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते प्रशांत डोंगरदिवे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके तसेच प्रसेनजीत पाटील उपस्थित होते.
प्रशांत डोंगरदिवे हे सामाजिक, शैक्षणिक तसेच वंचित व गरजू घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्यायाच्या प्रश्नांसाठी कार्य करण्याची भूमिका त्यांनी यापूर्वीही मांडली आहे.
नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न, वंचित घटकांचे प्रश्न आणि जनहिताच्या विषयांवर संघटनात्मक पातळीवर काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल प्रशांत डोंगरदिवे यांचे सहकारी, मित्र व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.









