आदर्श विद्यालयाची मार्शल आर्टपटू भक्ती फुलझाडेला जिल्हास्तरावर गोल्डमेडल
दि.17 सप्टेंबर 2026 ला जिल्हा क्रीडा संकुल बुलढाणा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मार्शल आर्ट वूशु स्पर्धेमध्ये कु.भक्ती फुलझाडे हिने 17 वर्षाखालील गटामध्ये 56 किलो वजन गटात प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) प्राप्त करून अमरावती येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल कु.भक्तीचे प्राचार्य श्री. सतिश गव्हले सर,उपप्राचार्य श्री.श्रीपाद दंडे सर,पर्यवेक्षक श्री.अविनाश असोलकर सर,सौ. इंदू खेडेकर मॅडम,सौ. ज्योती भावसार मॅडम सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी बंधू भगिनींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Views: 341








