आदर्श विद्यालय चिखली येथे नमामि भारतम् कार्यक्रम संपन्न…


आदर्श विद्यालय चिखली येथे नमामि भारतम् कार्यक्र सपन्न.
*३५०० विद्यार्थ्यांनी गायले सामूहिक वंदे मातरम्*
चिखली: स्थानिक आदर्श विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय चिखली येथे शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे संचालक गोपाल नाथमलजी बोरा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव प्रेमराज भाला यांच्या प्रमुख उपस्थितीत नमामि भारतम् कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे सहसचिव कैलास शेटे, संचा.लक संतोष खबुतरे, सुहास जामदार, प्राचार्य सतीश गव्हले, उपप्राचार्य श्रीपाद दंडे, पर्यवेक्षक ज्योती भावसार, अविनाश असोलकर, कोमल बाहेकर, या कार्यक्रमाचे निरीक्षक नंदकिशोर गायकवाड माजी प्राचार्य श्री शिवाजी हायस्कूल चिखली, नागेश महाराज गोळे, प्रल्हाद बांडे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य गव्हले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक प्रशांत देशमुख यांनी वंदे मातरम् गीताची माहिती सांगून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र भक्तीची भावना एक दृढ केली. जुलमी इंग्रजांची राजवट असताना भारतीयांनी याच वंदे मातरम् महामंत्राने इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. असे मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणा गोपाल बोरा यांनी वंदे मातरम् गीताविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. वेदमंत्रांप्रमाणेच वंदे मातरम देखील वंदनीय आहे. आपण आपल्या आईला वंदन करतो त्याचप्रमाणे आपल्याला राष्ट्राला देखील आपण वंदन करावे याकरिता हे गीत आपणास प्रेरीत करत असते असे मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणानंतर सकाळी ठीक ११:०० वाजता वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर शेवाळे तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्रीपाद दंडे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!