*आदर्श विद्यालय चिखलीच्या रायफल शूटर्सना जिल्हास्तरावर 10 मेडल*
दिनांक 24 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान हालेलूया इंग्लिश मीडियम स्कूल येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या रायफल शुटर्सनी 10 मेडल्स प्राप्त केली.यामध्ये 14 वर्षाखालील गटात
कु.अनुष्का परिहार गोल्ड मेडल
श्लोक खुनारे ब्रॉन्झ मेडल
शौर्या बाहेकर ब्रॉन्झ मेडल
समर्थ मेरेकर ब्रॉन्झ मेडल
17 वर्षाखालील गटामध्ये
आदित्य भवर गोल्ड मेडल
यशोदीप परिहार ब्रॉन्झ मेडल
19 वर्षाखालील गटात
ओंकार कुळकर्णी सिल्वर मेडल
रिया सदावर्ते सिल्वर मेडल
संजीवनी जाधव ब्रॉन्झ मेडल
धनराज जाधव ब्रॉन्झ मेडल
प्राप्त करून विभागस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधरजी महाले साहेब व शाळेचे प्रशासक संजीव यंगड यांच्या हस्ते सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.जिल्हास्तरावर मेडल प्राप्त केल्याबद्दल खेळाडूंचे
शि.प्र.मं.चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे,सचिव प्रेमराज भाला,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य गव्हले,उपप्राचार्य दंडे,पर्यवेक्षक असोलकर,भावसार मॅडम,खेडेकर मॅडम सर्व शिक्षक,प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.™









