महिलांना समानतेचा दर्जा देवूनच समाजाचा विकास होवू शकतो – प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई


महिलांना समानतेचा दर्जा देवूनच समाजाचा विकास होवू शकतो – प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई महिला सक्षमीकरण कार्यशाळा व निबंध स्पर्धा संपन्न चिखली (दि.१९/३/२०२६ ) शि.प्र.मं.तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय महिला विकास कक्ष,स्व ,सु.रा.चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय व भारतीय स्त्री शक्ती यांच्या संयुक्त विद्यामाने  महिला सक्षमीकरण कार्यशाळा व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण सोहऴा संपन्न झाला.*महिला सक्षमीकरण काळाची गरज  या विषयावर वक्ते प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई यांनी – भारतीय समाज सक्षम घडवायचा असेल महिलांना समानतेचा दर्जा देवूनच समाजाचा विकास होवू शकतो.संविधानाने दिलेले अधिकार समजून घेतले पाहीजे.शिवराया ,फुले,शाहू , आंबेडकर अश्या महामानवाना जो पर्यत आपण आपले आदर्श मानत नाही तो पर्यत आपला प्रगतीचा मार्ग सुकर होत नाही असे प्रतिपादन केले.पुढे ते म्हणाले कि आपल्या देशात महिलांना देवी किंवा दासी म्हणून स्विकारल तिला व्यक्ति म्हणून स्विकारणे देशाच्या हिताच आहे.तीच्या सहभागातून देशाची प्रगती होवू शकत असे मत व्यक्त केले.महिला सक्षमीकरण कार्यशाळा व बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व.सु.रा.चुनावाले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जोत्स्ना गुल्हाने ,तर प्रा.डॉ.दिलीप महाजन ,डॉ.ज्योती खरात,हेल्थ कोच सौ.माया लढ्ढा, प्रा.डॉ.विजय वाकोडे अधिक्षक पवन लढ्ढा,कु सोनाली तुपकर विचारमंचावर विराजमान होते.सुरूवातीला राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन झाले.पाहुण्याचा प्रास्ताविक परिचय प्रा.डॉ.विजय वाकोडे यांनी करून दिला.महिला सक्षमीकरण या विषयावर निबंध स्पर्धेत १४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.त्यातून प्रथम क्रमांक कु श्रावणी गणेश साळवे ,द्वितीय क्रमांक कु जानव्ही राजेन्द्र तेल्हारकर,तृतीय क्रमांक सनिका रमेश नायसे हिने पटकविला .तर प्रोत्साहन पर पुरस्कार देवून तनिष्का चांदने व तणूजा इघवे यांना सन्मानचिन्ह व पुस्तके देवून गौरविण्याच आले.या प्रसंगी ग्लोबल फाऊनडेशनी सन्माननीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.विजय वाकोडे तर आदर्श ग्रंथपाल पुरस्कार पुरस्कार प्राप्त डॉ.प्रदिप बारड यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर सौ.माया लढ्ढा यांनी  महिला व पोषण आहार यावर प्रात्यक्षीकासह व्याख्यान संपन्न झाले. बक्षीसे प्रायोजीत केल्याबद्दल प्रा.डॉ.प्रदीप बारड,प्रा.अरविंद घ्याळ,प्रा.संतोष काळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय मनोगत डॉ.जोत्स्ना गुल्हाणे यांनी व्यक्त केले तर सुत्रसंचालन कु.अश्विनी माळी हिने केले.या कार्यक्रमाला आयुर्वेदिक तथा एस.पी.एम महाविद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!