पीडित महिलेला सखी वन स्टॉप सेंटर ने मिळवून दिला न्याय*निराधार बेघर बेसहारा वृद्ध महिला बालकां करिता सदैव तत्पर रत्नदीप यशवंत शिनगारे (नगरसेवक)


पीडित महिलेला सखी वन स्टॉप सेंटर ने मिळवून दिला न्याय
निराधार बेघर बेसहारा वृद्ध महिला बालकां करिता सदैव तत्पर
रत्नदीप यशवंत शिनगारे (नगरसेवक)
(देवानंद वानखेडे चिखली) :- बारामती जिल्हा पुणे येथील विधवा पीडित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिला फुस लावून चिखली तालुक्यातील एका गावात वास्तव्य ठेवले दोन वर्षे चे उपभोग घेऊन पाच महिन्याची गरोदर ठेवून तिला घराबाहेर काढून दिल्याने त्या स्वस्त झाल्यामुळे ते गजानन नगर मधील काही महिलांचे संपर्कात आल्याने त्यांनी रत्नदीप यशवंत शिनगारे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डोंगरदिवे यांच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा च्या माध्यमातून त्या महिलेला न्याय मिळवून न्याय मिळवून देत भोकर येथील महिला आश्रम सुलोचना महिला आश्रम मध्ये प्रवेशित केले.
सविस्तर असे की बारामती तालुक्यातील एक विधवा महिला काही दिवसापूर्वी तिचे पती मरण पावल्याने तीला तिच्या नातेवाईकानी घराबाहेर केले म्हणून ती माहेरी आई वडिलांचा आधार घेऊन राहत होती तिथे चिखली तालुक्यातील एका तरुणाची व तिची भेट झाली पुढे प्रेम प्रकरणात रूपातर झाले. गोष्ट विवाह करण्याइतपत वाढली त्यामुळे त्या तरुणाने तिच्या आई वडिलांना सांगून तिला गावाकडे घेऊन आला तो स्वतः विवाहित होता हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले काही दिवसांनी त्याच्या पत्नी ला सर्व माहिती होताच त्या पीडितीला पाच महिन्याची गरोदर असतांना तिला घराबाहेर काढून दिले असता ती भटकंती करत चिखली येथे आली तेव्हा मोल मजुरी करणाऱ्या वंदना इंगळे सुषमा जाधव चंद्रकलाबाई गाडेकर या महिलांची तिची भेट झाल्याने त्यांनी लगेचच नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी पूर्ण हकीकत जाणून घेऊन लगेचच मानसेवा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी संपर्क साधला त्यावर सखी वन स्टाफ सेंटरच्या केंद्रप्रशासक आशा बोर्डे यांच्याशी संपर्क साधून सदर पीडित महिलेला बुलढाणा येथे भरती केले तेथे पाच दिवस ठेवून तिची पूर्ण वैद्यकीय तपासणी व इतर कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले व संबंधित आरोपी वर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या पीडित महिलेला तिची वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम व सुलोचना महिला आश्रम येथे ठेवण्यात आले आहे..
तसेच कुठेही विधवा निराधार बेघर महिला, वयोवृद्ध आजी आजोबा आढळून आल्यास 8855850378 किंवा 9689331853 सपंर्क करावा जेणेकरून पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आवाहन नगरसेवक रत्नदीप यशवंत शिनगारे यांनी केले.

SQAAF ++ मानांकन प्राप्त झालेली शाळा
शैक्षणिक सत्र 2026 -27 साठी ऍडमिशन सुरू

या सर्व प्रक्रियेत अमोल डिघोळे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात, रामेश्वर वसु तालुका संरक्षण अधिकारी बुलडाणा व जीवन चव्हाण तालुका संरक्षण अधिकारी चिखली यांच्या मध्यस्तीने व विशेष सहकार्याने आशा बोर्डे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर बुलढाणा, एडवोकेट अंजना घोंगडे मारोडकर बुलढाणा, श्वेता सुधाकर जाधव समुपदेशक, संगीता नितीन मोहिते वैद्यकीय कर्मचारी, रत्नदीप यशवंत शिनगारे, नगरसेवक चिखली, वंदना इंगळे,सुषमा जाधव, चंद्रकलाबाई गाडेकर, सुनील निकाळजे पोलीस पाटील साकेगाव,अनिता संतोष मोरे विद्या अनिल मोरे व प्रशांत डोंगरदिवे यांनी सहकार्य केले.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!