मराठी भाषेने समाजातील संवेदना जोपासली आहे – ,प्रा.डॉ.प्रदीप बारड चिखली ( दि ,२६/१/ ,२०२६,) स्थानिक शि.प्र.मं.स्व तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय,चिखली येथे ज्ञानपिठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमीत्त “मराठी भाषा गौरव दिन”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई यांनी कवी सुरेशभट यांच्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ! धर्म, पंथ ,जात एक जाणतो मराठी ,! एवढ्या जगात माय मानतो मराठी!!* याकवितेतून प्रास्तावना करत मराठी भाषेची महती सांगीतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुभाष गव्हाणे यांचे स्वागत डॉ.दिलीप महाजन तर वक्ते प्रा.डॉ.प्रदीप बारड यांचे स्वागत डॉ.बाळकृष्ण इंगळे यांनी केले.*मराठी भाषा ही लोकभाषा असून अनेक संतपंतानी तिला जोपासण्याच कार्य केले आहे. तीला अभिजीत भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून मराठी भाषेने समाजातील संवेदना जोपासल्या आहेत असे प्रतिपादन वक्ते प्रा.डॉ.प्रदीप बारड यांनी केले. यावेळी मराठी भाषेचा इतिहास देखिल उदाहरणासह उलगडून दाखविला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ.सुभाष गव्हाणे यांनी *मराठी भाषा ही चलनाची भाषा असून संसकृतीच दर्शन घडविणारी मायमावली होय.गावगाड्यातून हजारो शब्द जे प्रसवल्या गेले ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.ती आता जोपासली तरच मराठी जीवंत राहील अशी खंत व्यक्त केली.

या प्रसंगी ‘कथा वैभव ‘हे मराठी अभ्यासक्रमातील पुस्तके ग्रंथालयास भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.डॉ.प्रफुल्ल गवई यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनसोबत प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.









