(मेहकर प्रतिनिधी देवानंद वानखेडे )
डॉ. विकास दत्तू गवई यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर*
संभाजीनगर (प्रतिनिधी) – सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने डॉ. विकास दत्तू गवई (संभाजीनगर) यांची “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” साठी निवड करण्यात आली आहे.
तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.रविंद्र घोसाळे वतीने कळविण्यात आलेल्या निवडपत्रानुसार, भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे “संविधान अमृत महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात येणार असून, त्यामध्ये डॉ. गवई यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. गवई यांनी सामाजिक परिवर्तन, विचारप्रबोधन व विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन “राज्यस्तरीय पुरस्कार समिती”ने त्यांना या मानाच्या पुरस्कारासाठी निवडले आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता संगमनेर, जि. अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, डॉ. गवई यांना कुटुंबीय व सहकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडीबद्दल प्रा.डॉ.संदेश वाघ प्रा.डॉ.संतोष बनसोड प्रा.डॉ. संजय गायकवाड प्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद मैश्राम प्राचार्या डॉ.मिता रामटेके प्रा.डॉ.रेखा बडोदेकर डॉ.आशा फड प्रा.सरला पानतावणे प्रा.डॉ.सुजाता गोरखैडे प्रा.संदिप डोंगरे यांच्या सह विविध स्तरांतून डॉ. विकास गवई यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










