नगरसेविका सुप्रिया प्रशांत कुमार भटकर यांनी मा . ना . श्री .चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना दिले निवेदन (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य ) 


नगरसेविका सुप्रिया प्रशांत कुमार भटकर यांनी
मा . ना . श्री .चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना दिले निवेदन (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य )
सौ सुप्रिया प्रशांतकुमार भटकर नगरसेविका प्रभाग क्रमांक 12 चिखली .जि बुलढाणा मो . क्र . 8421702922 चिखली शहरातील काही महत्त्वाच्या विषयावर खालील प्रमाणे निवेदन दिले आहे
विषय :- १ ) मौजे चिखली, जि . बुलढाणा येथील शासनाच्या जागेवर राहणारे सन .२०११ पूर्वीचे रहिवाशांचे अतिक्रमण नियमाकुल करणे बाबत .
२ ) जे बेघर आहेत त्यांना शासनाच्या जागेवर घरकुल बांधुन मिळणे बाबत . त्या निवेदनाद्वारे असे म्हणाले की
मी आपणास लेखी निवेदन सादर करते की, मुद्दा क्र . १ ) मौजे चिखली येथिल शासनाच्या जागेवर सन .२०११ पूर्वीचे रहिवाशी अतिक्रमण करून वास्तव्य करत आहेत त्यांची जागा नियमकुल करण्याबाबत मी वेळोवेळी नगरपरिषद चिखली यांच्याकडे रितसर लेखी निवेदन सादर करून मागणी केलेली होती. दिनांक १५ / ०९ / २०२२ रोजी मा. मुख्याधिकारी न प चिखली यांना लेखी निवेदनाद्वारे मुद्दा उपस्थित केलेला होता की, आपण बिल्कॉन कन्सल्टन्सी यांना अनियमित मालमत्ता नियमीत करण्याबाबतचे सर्वेचे काम दिलेले होते शासनाच्या जागेत राहणाऱ्या रहिवाशांकडून बिल्कॉन कन्सल्टन्सी यांनी अनिमित्त मालमत्ता नियमित करण्यासाठी शंभर रुपयाची पावती दिली त्यावर आपल्या कार्यालयाने काय कारवाई केली लेखी खुलासा सादर करावा, तसेच तत्काळ नियमाकुल मालमत्ता नियमित करण्याबाबत कार्यवाही करावी आज रोज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही, चिखली शहरातील तसेच माझ्या प्रभाग क्र .१२ सिद्धार्थ नगर, इंदीरा नगर, मातंग पुरा ( भटकर बोर्डिंग ) भिम नगर , रोहीदास नगर परिसरातील अतिक्रमित जागेत पिढ्यान पिढ्या दारिद्रयात जगणारे रहीवाशी यांना न्याय मिळणे जरूरी आहे , दि . २५ मार्च २०२६ रोजी निघालेले शासनाचे परिपत्रक ( जि .आर ) नुसार अद्यापही चिखली नगर परिषद मध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नाही करिता विनंती करते की , मुख्याधिकारी यांना तत्काळ काम सुरू करणे बाबत आदेश द्यावा .
मुद्दा क्र २ ) चिखली शहरातील गरजु , अपेक्षीत, शोषीत, पिढीत ,गरीब वर्ग मोठ्या प्रमाणावर दारिद्रयात भाड्याच्या खोलीत पिढ्यान पिढ्या जगत आहे त्यांना आपल स्वतःच हक्काच घरकुल मिळायला हव करिता सन .२०१२ पासून मागणी नगर परिषदेकडे केलेली आहे . चिखली येथील न . प . चे मेहकर रोडवरील डंपींग ग्राउन्ड जागेवर घरकुल बांधुन देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केलेली होती, तांबुळवाडी येथे सुद्धा शासनाची जागा आहे तसे न झाल्यास शासनाची इतर ठीकाणी नगर परिषदेच्या ताब्यात असलेला भुखंड त्यांनी बेघरांच्या घरकुलासाठी देण्याबाबत वेळोवेळी मागणी केलेली होती करिता परिस्थितीचा विचार करून आपण बेघरांना घरकुल मिळावे करिता शासनाची जागा उपलब्ध करणे बाबत कार्यवाहीचे आदेश द्यावे ही नम्र विनंती . नगरसेविका यांनी केली आहे

SQAAF ++ मानांकन प्राप्त झालेली शाळा
शैक्षणिक सत्र 2026 -27 साठी ऍडमिशन सुरू


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!