चिखली न. पा.चे अध्यक्ष तथा श्रीराम नागरी बॅंकेचे अध्यक्ष मा. पंडीतराव देशमुख यांना ” फुले -शाहू-आंबेडकर ” पुरस्कार जाहीर !


चिखली न. पा.चे अध्यक्ष तथा श्रीराम नागरी बॅंकेचे अध्यक्ष मा. पंडीतराव देशमुख यांना ” फुले -शाहू-आंबेडकर ” पुरस्कार जाहीर !

चिखली जि. बुलढाणा येथील सुप्रसिद्ध सेवाभावी कार्यकर्ते तथा सामाजिक जाण व भान जपणारे एक सूज्ञ व्यक्तिमत्त्व तसेच स्थानिक श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, चिखली चे संस्थापक अध्यक्ष आणि नगर परिषदेचे पाच वेळा नाबाद नगर सेवक राहिलेले व आता नगर पालिका, चिखली चे विद्यमान अध्यक्ष पद भूषविणारे मा. पंडीत राव देशमुख ( दादा ) यांना, त्यांच्या जनमानसातील समर्पित सेवेसाठी, देशाच्या बहुतांश राज्यात आपल्या साहित्यिक व परिवर्तनवादी विचारांच्या साठी ख्यातनाम असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली च्या वतीने या वर्षीचा
” फुले -शाहू-आंबेडकर ” पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्कार त्यांना ब. सा . संघाच्या प्रस्तावित, संतनगरी पंढरपूर येथील दि. २३-०८-२०२६ रोजी आयोजित सातव्या बहुजन साहित्य संमेलन, २०२६ च्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून सदर पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना ब. सा. संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे तथा पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान यांच्या हस्ते सादर निमंत्रण देण्यात आले. बहुजन साहित्य संघाचा हा पुरस्कार अतिशय सन्मानाचा व मानवीय परिवर्तनवादी वैचारिक क्षेत्रातील विशेष म्हणून समजण्यात येतो. याप्रसंगी मा. कमलकिशोर लांडगे सर, मा. सिध्देश्वर ठेंग तसेच इतर मंडळी उपस्थित होती.
त्याबद्दल मा. पंडीतराव देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या संमेलनात सहभागी होण्याचे नम्र आवाहन अध्यक्षांच्या वतीने करण्यात येत असून त्याबाबत खालील मो. क्र. वर संपर्क साधावा अशी विनंती सर्व मान्यवर लेखक, कवी, कथाकार, कलावंत, साहित्यिक यांना करण्यात येत आहे.

संपर्क – १) ९९२२५१४३००, संयोजक – रवि पुष्पा वसंत सोनार, पंढरपूर…..
-२) ७७४४८११९८२, सचिव – डॉ. डी. व्ही. खरात सर, बुलढाणा…..


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!