लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सुरेश आप्पा खबुतरे पंढरपूर साहित्य संमेलन सोहळ्यात निमंत्रित !


लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सुरेश आप्पा खबुतरे पंढरपूर साहित्य संमेलन सोहळ्यात निमंत्रित !

चिखली: येथील गोरगरीब जनतेचे एकेकाळी कैवारी ठरलेले तथा आजही तळागाळातील लोक ज्यांना आपला माणूस म्हणून समजतात असे सर्वांच्या सुखदुःखाची दखल घेऊन त्यास सहकार्य व मदत करण्यास सदा तत्पर असलेले चिखली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश आप्पा खबुतरे यांना सुप्रसिद्ध बहुजन साहित्य संघाच्या वतीने बहुजनांच्या श्रध्देचे केंद्रस्थान असलेल्या संतनगरी पंढरीच्या पद्मनाभ पॅलेस हॉल येथे दि. २३-०८-२०२६ रोजी होऊ घातलेल्या, सातव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या अक्षरयात्री सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने सादर निमंत्रित करण्यात आले असून तसे निमंत्रण पत्र ब. सा. संघाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे व पदाधिकारी भावकवी अंकुश पडघान यांनी सन्मानाने दि. ३१-०७-२०२६ रोजी त्यांना देऊन त्यांचे अभिनंदन केले.मा. खबुतरे आप्पा यांनी आजपर्यंत सुप्रसिद्ध झेप साहित्य चळवळीच्या चिखली येथील बहुचर्चित साहित्य संमेलनासहीत अनेक साहित्य व कवी संमेलनांच्या आयोजन तथा संपन्नतेसाठी मोलाचे सहकार्य व योगदान देऊन फुले – आंबेडकरी चळवळीतील वैचारिक वारकरी या नात्याने सामाजिक प्रबोधनशील साहित्यिक, लेखक, कवींच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेले आहे.
या पूरोगामी सामाजिक समरसतेच्या सहृद सोहळ्यात सर्व साहित्य प्रेमी तथा अभ्यासू लेखनकलाध्यासी मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन नम्रपणे करण्यात येत असून सहभागासाठी पुढील मो. क्रमांकांवर संपर्क साधण्याची विनंती केली आहे. संपर्क – ९९२२५१४३००- रवि पुष्पा वसंत सोनार, पंढरपूर…..
७७४४८११९८२- डॉ. डी. व्ही. खरात, बुलढाणा…..


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!