शिवजयंती उत्साहात साजरी….
चिखली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन शिवभक्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, संघटना, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे, व्यायाम शाळा, विविध व्यावसायिक व व्यापारी संघटना एकत्र येऊन दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. या वर्षी देखील नेहमी सारखा उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. 18 फेब्रुवारीला रात्री बारा वाजता भव्य आतिषबाजी करण्यात आली १९ फेब्रुवारीला सकाळी शिवरायांचा अभिषेक व पूजन करण्यात आले ढोल ताशा पथकाने मानवंदना दिली शहरातून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आमदार श्वेता ताई महाले पाटील ह्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या . रक्तदान शिबिर झाले यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले सायंकाळी वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली यामध्ये अनेक लहान मुलांनी भाग घेतला होता..
चि खली शहर भगवेमय झाले होते.










