आदर्श विद्यालय, चिखली येथे ‘निवडणूक साक्षरता क्लब’ बैठक संपन्न..
मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी माननीय राजेंद्रजी पोळ साहेब, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सवडे साहेब, मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली मा.बिडगर साहेब यांच्या मार्गदर्शनात…..
चिखली, ८ जुलै २०२६: चिखली येथील आदर्श विद्यालय येथे आज दि. ८ जुलै २०२६ रोजी २३-चिखली विधानसभा मतदार संघांतर्गत ‘निवडणूक साक्षरता क्लब’ (ELC) च्या निमित्ताने मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये कार्यक्रमामध्ये सर्वांना जनजागृती तसेच blo आणि त्यांचे सहकारी आपल्या घरी आल्यानंतर त्यांना सहकार्य करावे यासाठी जनजागृती करणे , प्रभात फेरी आयोजित करणे ह्याविषयी मार्गदर्शन मा. नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड साहेब, व उपमुख्याधिकारी मा. गवळी साहेब, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य, सतीशजी गव्हले यांनी भूषण उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले या वेळी उपस्थित मध्ये मा. शकील सर प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, होते..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री गणेश अंभोरे सर यांनी केले या
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ELC चे प्रा .काकडे, प्रा. लोखंडे, श्री. राजू पवार, श्री. सुधीर शेटे यांचे सहकार्य लाभले…










