डोंगर शेवली येथे यात्रा महोत्सव संपन्न रंगनाथ सावळे पाटील प्रतिनिधी


डोंगर शेवली येथे यात्रा महोत्सव संपन्न
रंगनाथ सावळे पाटील जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
चिखली तालुक्यातील डोंगर शिवलीला गावामध्ये श्री सोमनाथ संस्थान हे खूप जुने आहे  या.संस्थानाच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री श्रावण मास व इतर दर सोमवारी भाविकांची खूप गर्दी असते व पंचक्रो असतील तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच प्रमाणात लोकांची भाविक श्रद्धा आहे या अनुषंगाने दरवर्षी अमली बारस एकादशी च्या दुसऱ्या दिवशी भव्ययात्रा महोत्सव भरतो यामध्ये डोंगर शेवली येथील गावकरी मंडळी स्वतःला त्यामध्ये पूर्ण समर्पित भावनेने दहा ते पंधरा दिवस खूप मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन गावातील वर्गणी गोळा करून व हा उत्सव आपला तो प्रत्येक येणाऱ्या भाविकांचा आहे व प्रत्येकाचा आहे असे दाखवून प्रत्येकांना ही यात्रा व यात्रेमध्ये एकादशीच्या रात्री पंचक्रोशीतील मंडळी तसेच येणारे भाविक मंडळी चिखली येथील राजू महाराज तसेच त्यांचे भक्तगण आणि डोंगर शेवली धोडप डोंगर खंडाळा करवंड किनोळा पळसखेड येथील लोक सेवा देतात तसेच रात्री वांग्याची भाजीसाठी वांगी कापणे व पुरीसाठी पीठ भिजवणे व व स्त्री मंडळी पुऱ्या लाटणे असे ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरून येतात व सर्व एकजुटीने काम करून आज रात्रीच्या दिवशी त्यांचे वाटप होते दुपारी तीन ते सात पर्यंत महाप्रसादाचे वाटप होतात तसेच या कार्यक्रमाच्या वाटपासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जसे खासदार असो आमदार असो सर्व मंडळी दर्शनाचा लाभ घेतात व आमच्या जागृत संस्थानात सढळ हाताने सद्भावनेतील मदत करतात त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पेटीमध्ये उत्पन्न तयार येत होते व तसेच या उत्पन्नाचा चांगल्या सत मार्गाने उपयोग केला जातो तसेच पंचक्रोशीतील मंडळी व संस्थांचे कमिटी चांगल्या प्रकारे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सेवा पुरवतात व तसेच पोलीस प्रशासन तसेच लागणारे इतर पाणी पाण्यासाठी असो लाईन साठी असो सर्व प्रमाणात त्या क्षेत्रातील लोक मदत करा आणि खरोखर हे यात्रा खूप श्रद्धेने व भावनिक देणे भरभरून सुखदायी असते…

डोंगरशेवलीत ‘ब’ दर्जा प्राप्त सोमनाथ संस्थानाची भव्य यात्रा; दुसऱ्या दिवशी देवाच्या वहाणीच्या शोभायात्रेने गाव दुमदुमले”
“मेघांचा गडगडाट, सरींचा वर्षाव… तरीही सोमनाथ यात्रेचा जल्लोष अविरतच राहिला!”

: डोंगरशेवली येथील ‘ब’ दर्जा प्राप्त श्री सोमनाथ महाराज संस्थान, डोंगरावर वसलेले श्रद्धास्थान, यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी.

डोंगरशेवली (ता. चिखली) प्रतिनिधी : सोमनाथ बा. सावळे

डोंगरावर वसलेल्या आणि प्रसिद्ध ‘ब’ दर्जा प्राप्त श्री सोमनाथ महाराज संस्थानात पार पडलेला भव्य यात्रा महोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. या यात्रेला हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.

पहाटे आरती, मंत्रमहाजप व महापूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, यात्रेदरम्यान काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या, मात्र त्यामुळे उत्साहात कोणतीही खंड पडली नाही. महाप्रसादाच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

या यात्रा महोत्सवात पंचक्रोशीतील धोडप, चांधई, शेलसूर, किन्होळा, डोंगरखंडाळा, पळसखेड सपकाळ, वरवंड बोराळा आदी गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महाप्रसादाच्या नियोजनासाठी ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी रात्रभर मेहनत घेतली. भाजी कापणे, पुरी तयार करणे, स्वच्छता आदी कामांत ते अखंडपणे कार्यरत होते.

भाविकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण आयोजन शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.

दरम्यान, यात्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी गावात भक्तीचा उत्साह कायम दिसून आला. दुसऱ्या दिवशी देवाच्या वहाणीची पारंपरिक शोभायात्रा हलगीच्या गजरात व भक्तांच्या जयघोषात उत्साहात पार पडली. या शोभायात्रेत मातेच्या वाहन मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. हलगीच्या आवाजाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले असून, सर्वत्र भक्तीचा जल्लोष उसळला होता. ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. गावातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

“जिथे भक्ती, तिथे शक्ती… आणि जिथे सहकार्य, तिथे यश,
या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार खास!”


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!