लेखक अनिल भगवान चव्हाण(ABC )यांना कर्तव्यदक्ष पुरस्कार जाहीर..
चिखली प्रतिनिधी
“स्थानिक येवता ता. चिखली जि बुलढाणा येथील गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणारे लेखक, कवी, शिक्षक अनिल भगवान चव्हाण (ABC )यांना काही दिवसापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार मिळाला होता आणि त्यानंतर लगेच त्यांना पुन्हा वर्ष 2026 मधला दुसरा पुरस्कार राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. अकोला येथील संकल्प बहूउद्देशीय संस्थेने त्यांना हा पुरस्कार नुकताच जाहीर केला असून याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रतीक्षा वासनिक मॅडम यांनी नुकतेच एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली..
12जुलै 2026 रोजी संतनगरी शेगाव याठिकाणी ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे..लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )यांची आतापर्यंत चार पुस्तकं प्रकाशित झालेले असून नुकतेच त्यांचे ‘शोध सुखाचा ’हे पुस्तकं प्रकाशित झालं असून सध्या हे पुस्तक प्रचंड गाजत आहे..अनिल चव्हाण यांना कर्तव्यदक्ष पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होतं आहे..”









