´आदर्श विद्यालय चिखलीची वर्ग दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
– येथील आदर्श विद्यालय दहावीच्या परीक्षेतील आपल्या उत्कृष्ट परंपरेस यंदाही साजेसा न्याय देत 99.09% निकालाची उज्ज्वल कामगिरी साकारली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, यावर्षी झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 443 विद्यार्थी बसले असता त्यातून 439 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पैकी 221 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीमध्ये आले असून त्यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेणारे एकूण46 विद्यार्थी आहेत. तर प्राविण्यश्रेणीत 221 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 146 विद्यार्थी , द्वितीय श्रेणीमध्ये 61तर पास श्रेणीमध्ये 11 विद्यार्थी याप्रमाणे घवघवीत यश संपादन केले आहे.
यावर्षीच्या परीक्षेमध्ये शाळेतून प्रथम येण्याचा मान कु. श्रावणी योगेश शिंदे 97.40% द्वितीय क्रमांक तनुजा एकनाथ जाधव 96.60% तृतीय क्रमांक जान्हवी जिवेश शेळके 96% यांनी मिळवला आहे.या यशामागे शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांची प्रेरणा तसेच विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे सखोल मार्गदर्शन, शाळेचे अभ्यासकेंद्रित वातावरण आणि पालकांचे सहकार्य या सर्वांचा समान वाटा असल्याचे शाळेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले त्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे , उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर, सचिव प्रेमराज भाला तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यालयाचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक सतीश गव्हले सर, तसेच उपमुख्याध्यापक श्रीपाद दंडे सर,पर्यवेक्षक सौ.ज्योतीताई भावसार, सौ. इंदुताई बाहेकर व वर्ग 10 चे वर्गशिक्षक दिनेश बैरागी,नंदाताई वानरे, गोपाल कुलकर्णी विकास जाधव अमित कुहिरे, सविताताई जपे सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी बंधू-भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.वरील निकाल हा आज बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केल्याप्रमाणे आहे व ‘बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट’ यावर आधारित आहे.










