शेलगाव जहागीर येथील अत्याचारप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी


शेलगाव जहागीर येथील अत्याचारप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी…
चिखली, प्रतिनिधी : शेलगाव जहागीर येथे एका मागासवर्गीय महिलेवर झालेल्या कथित अमानुष अत्याचारप्रकरणी आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
या प्रकरणात संबंधित महिलेस लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा तसेच तिच्यावर गंभीर स्वरूपाचा शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली चिखली शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज चिखली पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदार यांची भेट घेतली.
यावेळी प्रतिनिधी मंडळाने आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध लागू असलेल्या सर्व संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित महिलेला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या घटना समाजात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या असून, दोषींवर निष्पक्ष व कठोर कारवाई झाल्यासच पीडितेला न्याय मिळेल, असे मत व्यक्त केले.
या वेळी चिखली शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!