चरथ भिक्खवे चारिकं, बहुजनहिताय बहुजनसुखाय. नामो बुध्दाय जय भीम


संपूर्ण विश्वाचे महागुरू तथागत भगवान बुद्ध जे स्वतः दुःख मुक्त झाले व संपूर्ण विश्वाला धम्मच्या माध्यमातून मैत्री, करुणा व दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला त्या महान धम्माला तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व जगात शांतता निर्माण व्हावी, शांततेचा संदेश देण्यासाठी पूजनीय भिक्खु संघास आदेश दिला चरथ भिक्खवे चारिकं, बहुजनहिताय बहुजनसुखाय……
या आदेशाचे पालन करीत भिक्खु संघ अहोरात्र धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे.

याच उपदेशाला अनुसरून पूजनीय भदंत बोधीपालो महाथेरो लोकूत्तर महाविहार चौका, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूजनीय भिक्खु संघ तथागतांचा धम्म तळा गळात पोहचवण्याचे कार्य लोकुत्तर महाविहार शाखा भालगाव ते लोकुत्तर महाविहार चौका, छ. संभाजीनगर पद यात्रा द्वारे धम्म प्रसारित करणार आहे.
हि पदयात्रा सफल होण्यासाठी श्रद्धावान उपासक, उपासिकांनी आवश्यक लागणाऱ्या वस्तू व साहित्याचे दान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी भारत बोद्धमय करील त्यांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी पुण्य संपादन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

( पदयात्रा प्रारंभ दिनांक 09 फेब्रुवारी 2026 )

भिक्खु बी. राहुलो
लोकुत्तर महाविहार भालगाव.
8261000610


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!