- सांसद भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाचा झंजावाताची बुलढाणा जिल्ह्यात घोडदौड सुरू … कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न .
(जिल्हाध्यक्ष -भाई सिद्धांत वानखेडे )
दि.14 मार्च 2026 रोजी लोणार तालुक्यातील सुलतानपूर या गावी अनेक तरुण युवा कार्यकर्त्यांचा आझाद समाज पार्टी (कांशीराम) प्रणित भीम आर्मी मध्ये जाहीर पक्षप्रवेश बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाई सिद्धांत वानखेडे यांच्या अध्यक्ष खाली पार पाडण्यात आला. देशभर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, भारतीय संसदेमध्ये दलित, शोषित, उपेक्षित , आदिवासी, मुस्लिम, बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय याला वाचा फोडण्यासाठी खंबीरपणे मत मांडणारे भीम आर्मी, व आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा.भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत.
चिखली येथे आयोजन ज्यांना कुणाला सहभाग घ्याचा त्यांनी संपर्क करावा9850093245 अनेक युवा तरुणांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी लोणार तालुका उपाध्यक्ष म्हणून आतिश शिवाजी पनाड यांची नियुक्ती, तर गुणवंत सिद्धार्थ पवार यांची लोणार तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी, व अनिल दिलीप पनाड यांची तालुका कार्याध्यक्ष, प्रवीण ब्रह्मा सरदार यांची तालुका कोषाध्यक्ष, सिद्धार्थ विष्णू जावळे यांची तालुका संघटक पदी जिल्हाध्यक्ष भाई सिद्धांत वानखडे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यास सदिच्छा देत, भाई वानखेडे म्हणाले की आपण निश्चित रूपाने संसद भाई चंद्रशेखर आझाद यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचवाल तसेच तुमच्या पदाला निश्चितच न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार व्यक्त करत, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिंबिसार पनाड यांनी केले.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये 
सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांसाठी शिस्तप्रिय शाळा









