आदर्श विद्यालय चिखलीला (SQAFF) मूल्यांकन अंतर्गत ए प्लस दर्जा

SQAAF ++ मानांकन प्राप्त झालेली शाळा

आदर्श विद्यालय चिखलीला (SQAFF) मूल्यांकन अंतर्गत ए प्लस दर्जा..
.महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शाळांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नेमलेल्या कमिटीद्वारे झालेल्या बाह्य मूल्यांकनांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित आदर्श विद्यालय चिखलीला ए प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.
(SQAFF) शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अंतर्गत मूल्यांकन शाळास्तरावर करण्यात आले होते. व त्यानंतर जिल्हास्तरीय कमिटी येऊन त्या अंतर्गत मूल्यांकनाची तपासणी करण्यात आली व त्यानंतर काही शाळांची निवड करण्यात आली.
यामध्ये आपल्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून दोन विद्यालय व एका महाविद्यालयाची निवड झाली आहे.
आनंदाची बाब म्हणजे मागच्याच वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आदर्श विद्यालयाला जिल्ह्यातून दुसरे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्याचप्रमाणे शैक्षणिक संकुलामध्ये सर्व भौतिक सोयी सुविधा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत झालेली प्रगती तपासण्या करता व त्यामध्ये सातत्याने वाढ कशी होईल या उद्देशाने SQAFF या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली.
यामध्ये एकूण सहा क्षेत्र निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या या विद्यालयामध्ये सर्वच कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व योजनाबद्ध पद्धतीने राबवले जातात.
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे , सचिव प्रेमराज भाला तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय दिवसेंदिवस प्रगतीचा एकेक टप्पा ओलांडत आहे.
त्यामध्ये वर्ग दहावीतून सर्वात जास्त 90% पेक्षा जास्त विद्यार्थी गुणवत्ताधारक राहिलेले आहेत
विशेष बाब म्हणजे या विद्यालयांमध्ये गुणवत्तेच्या कुठल्याही निकषावर प्रवेश दिला जात नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या त्यासोबत संस्कार सुद्धा मिळावे या उद्देशाने अनेक वर्षापासून शिक्षण प्रसारक मंडळ कार्यरत आहे
त्याचीच पूर्तता म्हणून आदर्श विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक कशी वाढेल यासाठी प्रयत्न होत असतात
या सर्वांचं एकत्र असं मूल्यमापन या माध्यमातून झालं आहे
सातत्याने पालकांशी गृह संपर्क…
गणेशोत्सवासारख्या माध्यमातून समाज जागृती, वेळोवेळी स्नेहसंमेलन ,सहली त्यासोबत प्राविण्य वर्ग व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वर्ग अशा अनेक बाबींमध्ये शाळा आघाडीवर आहे त्याचाच परिपाक म्हणून शासनाने त्याची नोंद घेऊन विद्यालयाला हा बहुमान दिला आहे
या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण आता अ दर्जाच्या शाळेमध्ये शिकत असण्याचा स्वाभिमान प्राप्त झाला आहे
हा बहुमान मिळवण्याकरता विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले
सर्व स्तरातून विद्यालयाचे यासाठी कौतुक होत आहे.


14
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!