आदर्श विद्यालय चिखली येथे संत गाडगे महाराज जयंती जल्लोषात साजरी
स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे विद्यालयाचे प्राचार्य सतीश गव्हले यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगे महाराज जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक लक्ष्मीकांत शेटे श्रीपाद दंडे, प्रकाश तायडे विद्यालयातील शिक्षक सुधीर शेटे, कार्यक्रमाच्या संयोजिका योगिताताई गालफाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय योगिताताई गालफाडे मॅडम यांनी केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सतीश गव्हले यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संत गाडगेबाबा यांनी गावोगावी फिरून स्वच्छतेचा संदेश दिला अंधश्रद्धा जातीभेद आणि व्यसन विरुद्ध जनजागृती केली त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन समाजाला आदर्श दाखवला त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सुद्धा पटवून दिले त्यांनी मानवता व स्वच्छता या मूल्यांवर समाज सुधारणा केली असे सांगितले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी तन्वी वानखेडे व वसुधा देव माने यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी उसर या विद्यार्थिनीने केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गालफाडे मॅडम सुधीर शेटे सर ,फितवे मॅडम, खोत मॅडम यांनी सहकार्य केले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व स्वच्छतेचा संदेश देऊन संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.










