सातव्या बहुजन साहित्य संमेलनाची तारीख घोषित.


पंढरपूर : दि. २८-०६-२०२६.

सातव्या बहुजन साहित्य संमेलनाची तारीख घोषित.

महाराष्ट्र तथा बाहेर राज्यातही हळूवार प्रसिध्दी पावलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखली च्या गेल्या अनेक महिन्यांपासून बहुचर्चित सातव्या बहुजन साहित्य संमेलनाची तारीख अखेर स्थानिक नागालॅंड चौक स्थित नियोजित ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्रातील ख्याति प्राप्त साहित्यिक लेखक – कवि नागेश सिंघन यांच्या अध्यक्षतेखाली व सुप्रसिद्ध मार्मिक प्रकाशन चे सर्वेसर्वा रविंद्र वसंत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या बैठकीत ब. सा. सं. चे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष डॉ. बबनराव महामुने, सदस्य अंकुश पडघान अशा सर्वांनी मिळून दि. २३-०८-२०२६ या दिवशी संतनगरी पंढरीच्या पावन भूमीमधे सातवे राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलन, २०२६ घेण्याचे निश्चित करून तशी घोषणा सर्वांनी मिळून करण्यात आली.
तसेच प्रस्तावित संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात होवून रांगोळी प्रदर्शनी, ग्रंथ प्रदर्शनी, ( पोस्टर पोएट्री ) काव्यफलक प्रदर्शनी, उदघाटन, परिसंवाद, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम व एकांकिका, कविसंमेलन, विविध क्षेत्रातील समर्पित सेवेसाठी मान्यवरांना पुरस्कार वितरण, सहभागी साहित्यिकांचा सन्मान व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमास मान्यता देण्यात आली.
या निमित्ताने संतनगरीतील प्रस्तावित अक्षर यात्रेत सर्व मान्यवर साहित्यिक, कवि, लेखक, कथाकार, कलावंत इ. नी सोत्साह सहकार्य तथा योगदान देवून सहभागी होण्यासाठी आयोजक आणि संयोजक यांच्या कडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क :
रविंद्र सोनार : ९९२२५१४३००,
डॉ. डी. व्ही. खरात : ७७४४८११९८२.


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!