तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्माचा मैत्री करुणा शांती बंधुभाव व समानतेचा संदेश देण्यासाठी पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो


तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्माचा मैत्री करुणा शांती बंधुभाव व समानतेचा संदेश देण्यासाठी पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो (अनुसंघनायक, अखिल भारतीय भिक्खूसंघ, बोधगया, बिहार व संस्थापक अध्यक्ष लोकुत्तरा महाविहार चौका) यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये लोकुत्तरा महाविहार, भालगाव ता. चिखली जिल्हा बुलढाणा शाखा ते लोकुत्तरा महाविहार चौका इथपर्यंत पदयात्रेने ग्रामीण भागातील सर्व जनतेला उपदेश करून धम्माची जागृती करत करत तब्बल 11 दिवस पायी चालत आज येथे अत्यंत उत्साहात आणि समाधानात पदयात्रेचा समारोप होत आहे, या पदयात्रेमध्ये पूजनीय भदंत धम्मानंद, भदंत संघपाल, भदंत विनयशील, भदंत राहुलो, भदंत धम्मरतन, भंते आर्यनाग यांनी सहभाग घेऊन धम्म प्रचार आणि प्रसार केला, अत्यंत खडतर रस्त्याने खेडोपाडी फिरून पायी 150 किलोमीटर अंतर 11 दिवसांमध्ये पूर्ण करून त्यांना अत्यंत समाधान लाभले असे त्यांनी आपल्या अनुभवात कथन केले,
नुकतीच दीक्षा घेतलेले आणि आपल्या पूर्व आयुष्यामध्ये अत्यंत खडतर असा जीवन प्रवास असलेले भंते आर्यनाग यांनी अनुभव कथन करताना जीवनाच्या अत्यंत समाधानाची बाब सांगितली आणि मी पदयात्रेत सहभागी होऊन अत्यंत समाधानी झालो असे मत मांडले, मला खूप चांगला अनुभव आला आहे मी धम्मामध्ये माझा खारीचा वाटा निश्चितच उचलत आहे असे मत प्रदर्शित केले.
आपल्या तब्येतीमध्ये बरीच चढ-उतार होत असताना सुद्धा भदंत धम्मरतन यांनी ही पदयात्रा पूर्ण केली याचे वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते त्यांनी पुन्हा हा अनुभव मला घेण्यासाठी मी पुढे सुद्धा अशा पदयात्रेमध्ये सहभागी होईल असे प्रतिपादन केले.

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

खेडोपाडी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे त्यासाठी समूहाने भिक्खूसंघाने संघ सोबत घेऊन प्रचार प्रसार करण्यासाठी जावे आणि खरा धम्मप्रचारीत करावा जी खरी भिक्खू जीवनाची आवश्यकता आहे, एका विहारात राहून धम्म प्रचाराला मर्यादा पडतात त्यासाठी एक एकट्याने प्रचार प्रसार न करता समूहाने संघाने प्रचारासाठी खेडोपाडी गेले पाहिजे असे मतभदंत विनयशील यांनी मांडले.
सर्व अडचणीवर मात करीत अत्यंत समाधानाने पदयात्रेमध्ये सहभागी झालेले भदंत धम्मानंद यांनी स्वतःची तब्येत खराब असताना सुद्धा या अकरा दिवसाची पदयात्रा न थकता न थांबता पूर्ण केली आणि त्यांच्या मनातील संकल्प पूर्ण केला, वास्तविक त्यांची तब्येत तेवढी काही ठीक नव्हती पण कसलीही अडचण न येता एवढा लांब पायी प्रवास करून त्यांच्या चेहऱ्यावरील तेज हे निश्चितच सर्वांनी अनुभवले.
लोकुत्तरा महाविहार भालगाव शाखा येथील भदंत राहुलो या पदयात्रेचे मुख्य आयोजक यांचा अनुभव सर्वांना प्रफुल्लित करून गेला, त्यांनी या पदयात्रा आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी आपापल्या क्षमतेनुसार दिलेल्या दानाचे अनुमोदन केले, त्यांनी या पदयात्रेसाठी अथक परिश्रम करून खूप सुंदर व्यवस्था आणि सर्व सहभागी संघाचे नियोजन, भोजनाचे नियोजन, मुक्कामाचे नियोजन, व्यवस्थेचे नियोजन चोखपणे निभावले त्यांच्या अनुभवानुसार ग्रामीण जनतेला खऱ्या अर्थाने भिक्खू संघाची आवश्यकता आहे भिक्खु संघाला मिळालेला तथागतांचा आदेश चरथ भिक्खवेचारिकां बहुजन हिताय बहुजन सुखाय हा खऱ्या अर्थाने पालन करून खेडोपाडी अज्ञानी लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आपला वेळ, आपले ज्ञान आणि आपल्या समाधानासाठी, समाजाला समाजात जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, मी वयाने लहान असून सुद्धा मला सर्वांनी समजून घेतले आणि सहकार्य केले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि सर्वांना वंदन करतो, त्यांनी विशेष करून पूजनीय भदंत बोधिपालो महाथेरो यांनी आयोजनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी मदत केली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले, हा सर्व पदयात्रेचा यशस्वी गाडा पूर्णत्वास नेण्यामध्ये संघाने मला मदत केली मी या सर्व पुण्यकर्माचे श्रेय पूजनीय भिक्खूसंघ आणि या पदयात्रेमध्ये ज्या ज्या दानदात्यांनी मदत केली त्यांना समर्पित करतो असे समाधानाचे बोल मांडून ते सद्गतीत झाले.
पूजनीय भदंत कास्यप महाथेरो यांनी सुरेख असे येथे स्वागत कार्यक्रमाचे नियोजन केले, संचालन केले आणि लोकुत्तरा महाविहारांमध्ये अत्यंत सुरेख असा कार्यक्रम आयोजन झाला व सर्व पदयात्रेत सम्मिलित भिक्खूसंघाचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक आणि उपासिका स्वतः फुल बुके हार आणि आनंद घेऊन आले, कार्यक्रमांमध्ये अत्यंत स्पष्ट आणि नीटनेटकेपणा समाधानी वृत्ती व सर्वांच्या एक विचाराने कार्यक्रम किती सुंदर होतो पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची पदयात्रा काढून समाजामध्ये दुःख मुक्तीसाठी धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्खूसंघ कार्यरत राहील असे मत मांडले .
पूजनीय भदंत बोधीपालो महाथेरो यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील देऊन, सर्व नियोजनावर, कार्यक्रमाच्या आयोजनावर आणि पदयात्रेच्या आनंदी आणि समाधानी समारोपावर आनंद व्यक्त केला व सर्व समिती भिक्खूसंघाचे अभिनंदन केले, शेवटी सर्वांना आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी आज लोकुत्तरा महाविहार चौका संभाजीनगर (औरंगाबाद) संपूर्ण महिला मंडळाने तथागत भगवान बुद्धाच्या मूर्ती पासून विहाराच्या गेटपासून, बोधिवृक्षाच्या सभोवताली आणि मुख्य विहारांमध्ये फुलांची रांगोळी आणि सर्व रस्त्याने रांगोळी काढून अत्यंत सुंदर अशी सजावट केली त्या महिला मंडळाचेही खूप खूप अभिनंदन केले.
पदयात्रेजमध्ये धम्म सेवा करून पूर्ण यात्रेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सेवेदार व या पदयात्रे साठी श्रमघेणारे आयु.धम्मा प्रधान, आयु. दीपक साळवे, आयु. जानकीराम घोरपडे, आयु. सुरेश मघाडे, आयु. अशोक बनकर, आयु. शेषराव खरात, ऍड. पवनकुमार साळवे, आयु. अरविंद गजभिये, आयु. रवींद्र उमाळे, आयु. अनिल साळवे, आयु. संजय निकाळजे, आयु. रवी चव्हाण व ज्या ज्या गावामध्ये भिक्खु संघाच्या राहण्याची, भोजनाची वेवस्था केली त्या सर्वांचे विशेष असे अभिनंदन भिक्खू संघाने केले.
आज पूजनीय भदंत बोधीपालो महाथेरो, भदंत कश्यप महाथेरो, भदंत धम्मानंद, भदंत विनयशील, भदंत राहुलो,भदंत धम्मरतन, भदंत संघानंद,भंते आर्यनाग,भंते इद्धिपय्यों यांच्या उपस्थितीत समारोप अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी उपासक उपासिका हे महाविहारातील तथागत भगवान बुद्ध यांची पूजा वंदना, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून, सर्वांच्या हातात पुष्प,धूप, मेणबत्ती घेऊन लोकुत्तरा महाविहार ते रोडलगत भव्य तथागतांच्या बुद्धरूपा पर्यंत बुद्ध वंदनेच्या उद्घोषात धम्म रॅली काढण्यात आली, सर्वांनी अत्यंत श्रद्धापूर्वक सहभागी होऊन पुण्य संपादन केले, ह्या प्रसंगी बिल्ढा येथील पगडे परिवाराने भोजनदान देऊन पुण्य संपादन केले, सायंकाळी गिलानपच्यय संजयनगर येथील महिला मंडळाने देऊन पुण्यसंपादन केले, याप्रसंगी आयु. मंदाकिनी लेमाडे, संगीता पाखरे, आर आर लेमाडे, शोभा प्रधान, खिल्लारे ताई, आर ओ इंगळे, , दादा वाकोडे, माघाडे आई, संदीप काळे, पूजा कसबे, राजेंद्र गायकवाड, मायादेवी रत्नपारखे, संजय इंगळे फुलंब्री, निर्मला देवेंद्र गवई, पद्माबाई साळवे, प्रतिभा प्रशांत जोगदंड, वंदना खरात, रोडगे ताई, वाहूळताई, बिजलाबाई गडवे, चंद्रमणी पगारे, राजेंद्र नन्नावरे, रेखा शिरसाठ, काजल साळवे, प्रियंका प्रकाश जाधव,निर्मला तेजराव गवई, मीना नामदेव वानखेडे, अर्चना वाकळे, शीला पुंडगे, कुसुम माटे, सिंधू साळवे, सुंदराबाई गायकवाड, ताराबाई बनकर, शैला पोटभरे, विश्वंभर लोणे, सुदाम इंगळे, रोहिणी बोर्डे, कमल नरवडे, सामिंद्र जमधाडे, आर के इंगळे, रेखा शिरसाठ, कविता दाणे, संगीता थोरात, अशोक बनकर,आणि मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते.

वर्ग पाचवी ते बारावी आपला प्रवेश निश्चित करा
सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांसाठी शिस्तप्रिय शाळा

11
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!