- चिखली शहरामधील सैनिक नगर येथे माता रमाई यांची १२८ वी जयंती दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली.

सैनिक नगर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध व भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रामदास भाऊ देव्हडे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री धनंजय व्यवहारे सामाजिक कार्यकर्ते, चेतन देशमुख युवा भाजपा नेते, श्री विष्णू जोगदंडे (आरोग्य सभापती) नगरसेवक, अश्विनीताई जाधव नगरसेविका ,श्री दत्ता सुसर (पाणी पुरवठा सभापती) नगरसेवक उपस्थित होते.


सर्वांचे स्वागत माता रमाई बहुउद्देशीय संस्था सैनिक नगर चिखलीच्या पदाधिकाऱ्यांनी केले त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर श्री जोगदंडे सर , सुमेध जाधव सर ,श्री.चेतन देशमुख यांनी प्रकाश टाकला. 
त्यानंतर कु साक्षी, कु सांची कु. खुशी कु. संजीवनी यांनी सुंदर असे रमाबाई च्या जीवनावर नाटिका नृत्य सादर केले .शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना आदरणीय रामदास भाऊ देव्हडे यांनी रमाई माता यांच्या जीवनातील प्रसंग बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान किती महत्त्वाचे याच मार्गदर्शन केले. आणि यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याठिकाणी रमाईच्या जीवनावर फुले, शाहू, आंबेडकरांच्या जीवनावर गीत गायनाचा सदाबहार कार्यक्रम आयु.अरुण भिसे व आयु.राहुल पवार सर,सिद्धार्थ धंदरे सुमेध जाधव, यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.राहुल पवार सर व आयु.सुमेध जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.बेल्टे सर यांनी केले
.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आयु. रामेश्वर वानखेडे ,उपाध्यक्ष भास्कर खरात, सचिव अरुण भिसे, सहसचिव सतीश खरात सर, कोषाध्यक्ष रामभाऊ वानखेडे, दीपक गवई भास्कर भांबळे, भीमराव जाधव ,संजय कदम, संजय साबळे , दीपक वाकळे संतोष गवई अशोक चव्हाण, नंदकिशोर ढाकरके ,शिंगणे सर ,जालिंदर खंदारे ,अमोल बेल्टे मोहन मंडळकर आदीनी परिश्रम घेतले यावेळी परिसरातील उपासक, उपासिका, नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 


गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये 
Views: 169









