
चिखली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या नामवंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने समतादूत मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अंबाशी येथे संविधान प्रत भेट दिली. सदर संविधान प्रत व आकर्षक सन्मान चिन्ह हे मुख्याध्यापक गोविंद धनवटे सर यांना देण्यात आले. भारतीय संविधान हे देशाचा सर्वोच्च कायदा असून ते लोकशाहीचे रक्षण करते, नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करते आणि सरकारची कार्यपद्धती व मर्यादा निश्चित करते. त्यामुळे संविधानाचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, कायद्याची माहिती व्हावी या हेतूने संविधान प्रतचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी सरपंच वहिद सर, माजी उपसरपंच प्रकाश पवार, माजी सरपंच हारून सेठ, सै.युसूफ भाई, राजू लहाने, रमेश मापारी, जगन्नाथ घाटे, रघुनाथ लहाने, प्रशांत वायकोस, संदीप वानखेडे, किशोर पवळ, नंदकिशोर शेजूळ, अंगणवाडी सेविका हमिदाबी, कनिजाबी, संघमित्रा पवार, मदतनीस शालिनी पवार, बेबीताई गवई, सुलोचना देशमुख इत्यादी उपस्थित होते.









