मा विलास पाटील इंगळे यांना
“आसई भूषण पुरस्काराने “ सन्मानित
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मांसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज (स्मृतिदिन) वीर महाराणा प्रताप, राष्ट्रसंत गाडगेबाबा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा एकत्रित सार्वत्रिक जयंती सोहळा..
आज दी.14:05:2026 जुई फाउंडेशन , शंभू राजे फाउंडेशन, मोरिया गणेश उत्सव, फुले शाहू आंबेडकर उत्सव समिती, व युद्धभूमी आसई ग्रामस्थ
यांच्या पुढाकारातून छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील विविध उपक्रम साजरे केले गेले. यावेळी 90% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार. नव्याने शासकीय नोकरी निवड झालेल्यांचा सत्कार.
शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्यांचा सेवा गौरव. तसेच यावेळी रमेश गिरी नांदेडकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच युद्धभूमी आसई येथील गावतील एका व्यक्तीला “आसई भूषण पुरस्काराने सन्मानित “करण्याचे ठरले. जुई फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी मिळून ज्यांचे वैचारिक,सांस्कृतिक उत्सव , सामाजिक कार्य, शैक्षणिक, गावतील मतभेद दूर करून एकोपा तयार करणे, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीने काम करणे , सुख दुःखात हिरिरीने सहभागी होणे, गरजूंना मदत करणे असे अनेक क्षेत्रात असलेले कार्य, असल्याने एकमताने मा श्री विलास प्रकाशराव इंगळे यांच्या नावावर “आसई भूषण पुरस्कार “ देण्याबद्दल शिक्कामोर्तब केले. व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आसई भूषण पुरस्कार 2026 “मानपत्र “देऊन सन्मानित करण्यात आले…
यावेळी श्री विलासराव यांनी सत्काराला उत्तर देताना विलास पाटील इंगळे यांच्या भावना दाटून आल्या आणि त्यांनी सांगितले की आसई भूषण पुरस्कार मला दिल्यानंतर माझ्या जबाबदारीमध्ये अधिकची वाढ झाली आहे त्याची मला नक्कीच जाणीव आहे. हा माझ्या जन्म भूमी व कर्म भूमी मधे सर्व गावकरी मंडळींनी जो आसई भूषण पुरस्काराने सन्मानित केले ते मला जीवन गौरव पुरस्कारा पेक्षाही लहान नाही,जुई फाऊंडेशन व गावकरी मंडळी यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला हृदयाला तड जाणार नाही आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल मी भारावून गेलो आहे ,या भावना या वेळी श्री विलास पाटील इंगळे यांनी व्यक्त केल्या या वेळी फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी ग्रामस्त बालगोपाळ विविध क्षेत्रातीन कलाकार मान्यवर महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..













