माणसाच्या मनात माणूसकीचा मळा निर्माण होणे….ॲड. विजयकुमार कस्तुरे.


माणसाच्या मनात माणूसकीचा मळा निर्माण होणे ही खरी काळाची गरज आहे !-ॲड. विजयकुमार कस्तुरे.                                                                पुणे :

येथील स्वानंद पार्टी हॉल, ऋषिकेश पार्क, हडपसर च्या सुंदर सभागृहात दि. ०१-०५-२०२६ रोजी आयोजित केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या राज्य स्तरीय संमेलन आणि राज्य कार्यालयाच्या उदघाटनाच्या निमित्ताने मा.राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने आपले विचार मांडत असताना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक चळवळीतील खंदे सैनिक ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी अत्यंत परखडपणे वरील विधान केले.
पुढे बोलताना माणसाने माणसाला माणूस म्हणून समजून घेणे आणि प्रत्येका विषयी
आपल्या हृदयात आस्था, आपुलकी, आत्मीयता, प्रेम, आपपरसमभाव, सहिष्णुता, सौजन्याची भावना जोपासणे तसेच माणूस या नात्याने आपले कर्तव्य आणि जबाबदारी व सोबतच वैश्विक तथा जगातील प्रत्येक देशाने व आपल्या भारत देशानेही आपापल्या परीने अधिनियमाच्या स्वरूपात मानवाधिकारांना दिलेले समर्थन व संरक्षण याची जाणीव अन् स्मरण ठेवून तसे वर्तन ठेवणे..
यालाच माणूस म्हणता येईल अन् हे सर्व विसरून जगण्याला, जल्मी आला हेला नि पानी वाहता वाहता मेला…..असेच म्हणावे लागेल हे आवर्जून सांगताना हे मानवीय कार्य करण्यासाठीच केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली ची स्थापना डॉ. दहिवले सरांनी केलेली असून आपण सर्वांनी या पवित्र कार्यात त्यांच्याबरोबर तनमन धनाने योगदान दिले पाहिजे असे भावनिक आवाहन सुध्दा केले. जगाच्या इतिहासात मानवी कल्याणासाठी ज्या महापुरुषांनी आजन्म वाहून घेवून प्रसंगी सर्वस्वाचे बलीदान केले त्यांच्या शिकवणी आपल्या कविता, कवने, शेरोशायरी, विधानाद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत तथा उर्दू अशा विविध भाषांमधून गाऊन व कथन करून क्षणात हसवीत तर क्षणात गंभीर करीत हे मानवीय पुण्य कार्य करण्याची संधी आपल्याला या संगठनच्या माध्यमातून मिळाली असून त्यानिमित्ताने माणूस म्हणून जगण्याचे आपण सोने केले पाहिजे हा ही आग्रह त्यांनी सर्वांना केला

गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी माफक दरामध्ये

.
एवढेच नाही तर पुण्यातील संगठनच्या या सेवाभावी कार्यात आज उदघाटन झालेल्या कार्यालयाच्या माध्यमातून मानवाधिकार संवर्धनाची धुरा प्रत्येकाने सामर्थ्यपूर्वक पेलून संगठनचा नावलौकिक वाढविण्यासाठी तत्पर असले पाहिजे हे सुध्दा निक्षून सांगितले.
कें. मा. सं. चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते पुणे कार्यालयाच्या उदघाटनानंतर सुरू झालेल्या या अधिवेशनात संगठनच्या सक्रिय राष्ट्रीय महिला प्रकोष्ट पदाधिकारी डॉ. ज्योती गुरव, गोवा राज्य पदाधिकारी डॉ. सूरज बेहेरे, ह्या अधिवेशनाचे आयोजक आयुष्मान रमेश गायकवाड, सुप्रसिद्ध साहित्यिक तथा कें. मा. सं. चे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. बबनराव महामुने, ब्रम्हकुमारी अंशुमला दिदी इ. ची संगठनच्या तथा माणसाच्या मानवाधिकार संदर्भात मार्गदर्शन व प्रबोधन करणारी भाषणे झाली. तसेच कें. मा. सं. चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांनी संगठनच्या संस्थापनेपासूनचा करावा लागलेला संघर्ष आणि तरी देशभर व देशाबाहेर सुध्दा मानवाधिकार संवर्धनार्थ आपल्या विचाराचे सहकारी जोडत पाच लाखाच्या वर निस्वार्थ सेवाव्रती कें. मा. सं. च्या माध्यमातून जुळवून हा समाजकार्याचा रथ यशस्वीरीत्या इथपर्यंत आणला असून तो असाच सातत्याने व सक्षमपणे पुढे नेणे आपले आद्य कर्तव्य आहे असे भावनिक आवाहन सुध्दा सर्वांना केले.
या सुंदर व अविस्मरणीय सोहळ्याची वैशिष्ट्ये म्हणजे मान्यवरांचे हस्ते संगठनच्या लोबोचे करण्यात आलेले विमोचन महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पार्पणाने करण्यात आलेले अभिवादन, डॉ. मिलिंद दहिवले, डॉ. विजयकुमार कस्तुरे तथा डॉ. सूरज बेहेरे यांना ( म. फुले फेम ) पुणेरी पगडी चढवून त्यांचा पुणेकर मंडळींच्या तर्फे करण्यात आलेला हृद्य सन्मान व सत्कार, डॉ. विजयकुमार कस्तुरे यांना रा. अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार व बाबासाहेबांच्या जनता पत्राच्या अंकांच्या संकलन ग्रंथाची विशाल प्रत प्रदान करून झालेला सन्मान, समाजाच्या विविध क्षेत्रात मानवीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैचारिक व वैधानिक सेवा कार्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन केलेला गौरव, ॲड. कस्तुरे यांचे विविध भाषांमधून प्रसंगी काव्यगीत गाऊन कलाविष्काराद्वारे करण्यात आलेले वैचारिक प्रबोधन, नृत्यनिपूण प्रा. प्रियदर्शन सोनटक्के उर्फ टिना कोल्हापूरकर यांचा अभिवादनीय नृत्यकलाविष्कार, बुध्द जयंती, जागतिक कामगार दिन तथा महाराष्ट्र दिवस निमित्ताने या पवित्र पर्वावर करण्यात आलेले श्रध्देय अभिवादन व त्या संदर्भातील महात्म्य कथनाचे सर्वांनी दाखवलेले आत्मभान, आयोजकांनी केलेली शीतपेय जल आणि रूचकर भोजन व्यवस्था, सुंदर सुशोभित भव्य सभामंडप आणि डॉ. डी. व्ही. खरात यांचे सुंदर आणि प्रसंगाभिमुख सूत्रसंचालन अशा सर्वार्थसंपन्न झालेल्या या उदघाटन व अधिवेशन समारंभाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आयोजक रमेश गायकवाड तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी बरेच परिश्रम घेतले.


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!