देशाच्या विकासात Gen Z ची भूमिका महत्वाची : प्रा.डॉ. सुभाष राऊत


प्रतिनिधी गोदरी : (चिखली:स्थानीक) एस.पी.एम.स्व.तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरा”च्या सातव्या दिवशीच्या दैनिक नियोजनात “Gen-Z”व”अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयांवर अनुक्रमे प्रा.डॉ.सुभाष राऊत व सौ.स्वातीताई सावजी यांची व्याख्याने संपन्न झाली. सातव्या दिवशीच्या दुपार सत्र कार्यक्रम प्रसंगी”छत्रपती शिवराय व राष्ट्रसंत गाडगेबाबा” यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळकृष्ण इंगळे यांनी करून दिला व अतिथींचे पुष्पगुच्छ व नारळ देऊन स्वागत करण्यात आले.

दुपारच्या सत्रात प्रा.डॉ.सुभाष राऊत यांनी या संदर्भात शिबिरार्थीना “भारताच्या विकासासाठी Gen-Z ची भूमिका”या विषयावर उदबोधन केले. यात भारत हा तरुणांचा देश आहे त्यामुळे या युवा शक्तीनि सकारात्मक भूमिका घेतल्यास देश विकसित व्हायला वेळ लागणार नाही. परंतु प्रत्यक्षात नवीन पिढी समोरील उभी आव्हाने पेलण्याची क्षमता कमी झाल्याचे संशोधनात दिसून येते. त्यामुळे नविन जनरेशन ने वेळीच जागृत होण्याची गरज समजावून सांगितली.यानंतर सौ.स्वातीताई सावजी यांनी “अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती”या विषयावर शिबिराथींना विविध प्रयोगांच्या माध्यमातून भोंदु बाबा समा ज्याची कशी फसवणूक करतात हे प्रात्यक्षिक करून दाखवुन समाजातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे व जनजागृती करण्याचे आवाहन मार्गदर्शकांनी याप्रसंगी केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दिलीप महाजन यांनी आलेल्या सर्व अतिथींचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. बाळकृष्ण इंगळे यांनी केले.अशा प्रकारे “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या”सातव्या दिवशी च्या दोन्ही सत्रांचा समारोप विविध प्रकारच्या मार्गदर्शक कार्यक्रमांनी यशस्वीपणें संपन्न झाला.


12
कृपया वोट करा

VISHAKHA 24 NEWS च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!